मुंबई : 'वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई', 'साहब बीवी और गॅंगस्टर', 'जिस्म 2', 'मर्डर 3', 'हायवे', 'किक', 'रंग रसिया', 'लाल रंग', 'सरबजित', 'सुलतान' आणि 'बागी 2' सारख्या चित्रपटांमध्ये झळकलेला बॉलिवूड अभिनेता रणदीप हूडा आज आपला 44 वा वाढदिवस साजरा करीत आहे. २००१ साली त्यांनी 'मान्सून वेडिंग' चित्रपटाद्वारे आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. आज रणदीप बॉलीवूडमधील नामांकित कलाकारांपैकी एक आहे.
२० ऑगस्ट १९७६ रोजी हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यात रणदीपचा जन्म झाला. त्याचे वडिल डॉक्टर आणि आई सामाजिक कार्यकत्या आहेत.
अभिनेता रणदीप हूडा रणदीपने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात तारुण्याच्या काळात मित्रांसमवेत 'मॉन्सून वेडिंग' या चित्रपटाद्वारे केली होती. २००१ मध्ये नसीरुद्दीन शाह यांच्या 'द प्ले टू टीच हीज ओन' या नाटकाच्या तालीमच्या वेळी त्याने चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर यांची भेट घेतली आणि रणदीपला त्यांच्या 'मॉन्सून वेडिंग' चित्रपटासाठी ऑडिशन देण्यास सांगितले. ज्यामध्ये तो निवडला गेला.
रणदीप हूडा आजपर्यंत 'मानसून वेडिंग' चित्रपटानंतर 'रिस्क', 'डरना जरूरी है', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई', 'साहिब बीवी और गैंगस्टर', 'जिस्म 2', 'मर्डर 3', 'हाइवे', 'किक', 'रंग रसिया', 'लाल रंग', 'सरबजीत', 'सुल्तान' और 'बागी 2' यासारख्या चित्रपटातून झळकला आहे.