महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बिपाशा बसुने 'सेल्फ लव्ह'वर दिला जोर - अभिनेत्री बिपाशा बसू

अभिनेत्री बिपाशा बसूने आपला एक फोटो शेअर करीत स्वतःवर प्रेम करण्याचे आवाहन आपल्या चाहत्यांना केले आहे. तिच्या या फोटोवर असंख्या कॉमेंट्स पाहायला मिळत आहेत.

Bipasha Basu
अभिनेत्री बिपाशा बसू

By

Published : Oct 12, 2020, 1:19 PM IST

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसूने आपल्या नवीन सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून लोकांना स्वतःवर प्रेम करण्याचे आवाहन केले. अभिनेत्री बिपाशा बसूने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, यात ती पांढर्‍या क्रॉप टॉप आणि व्हाईट लेसी शॉट्समध्ये अत्यंत बोल्ड दिसत आहे.

बिपाशाने आपल्या फोटोला कॅप्शन देताना लिहिलंय, "स्वतःवर पूर्णपणे, मनापासून, खोलवर, विश्वासपूर्वक प्रेम करा." तिच्या या फोटोवर असंख्या कॉमेंट्स पाहायला मिळत आहेत.

अभिनेत्रीने अलिकडे गेल्या वर्षीच्या दुर्गा पूजा कार्यक्रमाचा फोटो शेअर केला आहे. यात ती नवरा करण ग्रोव्हरसोबत आणि आपल्या नातेवाईकांसोबत दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details