मुंबई - बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. दरम्यान सुशांतच्या वडिलांनी बिहार पोलिसांकडे रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणात आता बिहार पोलिसांकडून तपास केला जातोय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बिहार पोलिसांचे एक पथक मुंबईत दाखल झाले आहे. सुशांतच्या २ कंपनीच्या आर्थिक देवाण-घेवाणीच्या संदर्भातील कागदपत्रांची चौकशी बिहार पोलिसांकडून करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या Vividrage RhealityX Pvt Ltd व Front India for World Foundation या दोन कंपनी होत्या. या दोन्ही कंपनीवर सुशांत याच्याबरोबर संचालक म्हणून रिया व तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांचीसुद्धा नावे आहेत. बिहार पोलिसांच्या मते या कंपनीच्या व्यवहारात बरीच अनियमितता असण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट फायदा रिया व तिचा भाऊ शोविक यांना झाला आहे. या बरोबरच बिहार पोलीस सुशांत याच्या सीएशीसुद्धा बिहार पोलीस संपर्क साधत आहेत. मुंबई पोलीस व बिहार पोलीस या दोघांचा तपास वेगवेगळ्या पद्धतीने सुरु आहे.