मुंबई -अभिनेता सोनू सूद गेल्या काही दिवसांपासून स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्याचे काम करीत आहे. त्याच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. बिग बॉसच्या 12व्या सीझनमधून प्रसिद्धीच्या झोतात आलेला गायक दीपक ठाकूरने सोनू सूदवर एक गाणे तयार केले आहे.
सोनू सूदचे कौतुक करणारे दीपक ठाकूरचे गाणे सोशल मीडियावर व्हायरल - deepak thakur share song on sonu sood
लॉकडाऊनमुळे संकटात सापडलेल्या मजुरांना गावी परत पाठवण्यासाठी सोनू सूद काम करत आहे. त्याचे यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे. बिग बॉस फेम दीपक ठाकूर याने सोनू सूद वर एक गाणे बनवले आहे. हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
दीपक ठाकूरने गाण्याचा व्हीडिओ त्याच्या सोशल मीडिया अकांऊटवर शेअर केला आहे. दीपक ठाकूरने बनवलेला व्हीडिओ पाहिल्यानंतर सोनू सूदने‘क्या बात है भाई' अशी प्रतिक्रिया दिली आहे. हे गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे.
रविवारी सोनू सूद याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, राज्यसभा सदस्य अमर पटनायक यांच्यासह इतर अभिनेत्यांनी सोनू सूदचे कौतुक केले आहे.