मुंबई- टेलिव्हिजन अभिनेत्री तेजस्वी प्रकाश रविवारी रात्री बिग बॉस 15 ची विजेती ठरली. ग्रँड फिनालेनंतर तेजस्वी घरी परतली आणि तिच्या पालकांनी तिचे भव्य स्वागत केले. तेजस्वीचा प्रियकर करण कुंद्रा याने शोमध्ये तिसरा क्रमांक पटकावला होता. तो देखील तिच्यासोबत होता. बिग बॉसच्या घरात 120 दिवस घालवल्यानंतर ते घरी परतले.
बिग बॉस 15 ची विजेती तेजस्वी प्रकाश जेव्हा आपल्या घरी पोहोचली तेव्हा तिला आश्चर्याचा धक्काच बसला. तिच्या स्वागतासाठी पालकांनी घर अगदी बिग बॉस 15 च्या सीझनची जंगल-थीम प्रमाणे सजवले होते. यावेळी तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिचा प्रियकर करण कुंद्राही दिसत आहे.
स्वरागिनी - जोडें रिश्तों के सूर या मालिकेमधील अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या तेजस्वी प्रकाशने 40 लाखांच्या रोख बक्षीसासह बिग बॉस ट्रॉफी घरी नेली. शोचा होस्ट सुपरस्टार सलमान खान याने विजेत्याची घोषणा केली.