मुंबई -बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुक्लाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. या बातमीने मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. सिद्धार्थने वयाच्या 40 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मुंबईतील एका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली असून अनेकांनी सिद्धार्थला सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे.
सिद्धार्थ शुक्ला अभिनेता, मॉडेल आणि होस्ट होता. त्याने एक मॉडेल म्हणून आपल्या करियरला सुरुवात केली होती. 2008 च्या ‘बाबुल का आंगन छुटे ना’ या शोमधील मुख्य भूमिकेतून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 2014 मध्ये, शुक्लानं ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये सहाय्यक भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तर ब्रोकन बट ब्यूटीफुल 3’, ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’मधील भूमिका त्याने अत्यंत उत्तमरित्या पार पाडल्या होत्या. याचबरोबर त्याने सावधान इंडिया आणि इंडियाज गॉट टॅलेंट हे शो होस्ट केले होते. बिग बॉस १३ आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी या रिऍलिटी शोचे तो विजेते होता. येथून तो फारच प्रसिद्ध झाला होता.
शेहनाझ गिल आणि सिद्धार्थची जोडी -