ETV Bharat Maharashtra

महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

शुभेच्छा देणाऱ्या चाहत्यांबद्दल बच्चन यांनी व्यक्त केली कृतज्ञता - अमिताभ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

अमिताभ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून हजारो चाहते त्यांना बरे होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. अमिताभ यांनी सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी पोस्ट लिहिली आहे.

Big B
अमिताभ बच्चन
author img

By

Published : Jul 17, 2020, 3:10 PM IST

मुंबई - मुंबईच्या नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गुरुवारी कोरोना व्हायरसवर उपचार घेत असलेल्या बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना व शुभेच्छा दिलेल्या चाहत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्याला चाहत्यांचे संदेश मिळत असल्याचे अमिताभ यांनी म्हटले आहे. ट्विटरवरून त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.

त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, ''मला तुम्हा सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळत आहे आणि आमच्या भल्यासाठी प्रार्थनाही... एसएमएसवर, व्हॉट्सअ‍ॅपवर, ब्लॉगवर इन्स्टावर... आणि सर्व शक्य सोशल मीडियावर." असे लिहित त्यांनी आपली चाहत्यांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली आहे.

अमिताभ रोज सोशल मीडियावरून आपली ख्याली-खुशाली चाहत्यांना कळवत असतात. अलिकडेच त्यांनी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्सेसवर एक सुंदर पोस्ट लिहून त्यांच्याबद्दलची कतज्ञतेची भावना व्यक्त केली होती. बच्चन लवकर बरे व्हावेत, यासाठी देशभर लोक प्रार्थना करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details