मुंबई - सध्या देशभर लॉकडाऊन सुरू असताना अमिताभ बच्चन यांनी प्रशासनाला एक अनोखा सल्ला दिलाय. सध्या देशात रेल्वे बंद आहे. त्यामुळे रेल्वेच्या डब्यांचा उपयोग आयसोलेशन वॉर्ड बनवण्यासाठी होऊ शकतो, अशी कल्पना बिग बी यांनी मांडली आहे. त्यांच्या एका फॅनने ही कल्पना सूचवल्याचे अमिताभ यांनी ट्विटरवर लिहिलंय.
अमिताभ यांनी स्क्रीन शॉट ट्विटरवर शेअर करीत लिहिलंय, ''सर्व सरकारी प्रशासनासाठी एक आयडिया. सर्व ट्रेन सेवा ठप्प आहे. ट्रेनचे डबे रिकामे आहेत. सर्वात २० खोल्या आहेत. याचा उपयोग होऊ शकतो. ३००० ट्रेन भारतात आहेत. म्हणजे ६० हजार बेड्स. काही केसेमध्ये याचा आयसोलेशनसाठी उपयोग होऊ शकतो. रुग्णालये नसण्याच्या स्थितीपेक्षा हे बरे आहे.''
अमिताभ यांच्या या कल्पनेचे फॅन्सनी स्वागत केले आहे. खरंतर अशी वेळ येऊ नये, असेही त्यांनी पुढे म्हटलंय.
एका युजरने कॉमेंटमध्ये लिहिलंय, ''चांगला विचार आहे. परंतु आशा करुयात की याची गरज पडू नये. #कोविड2019 संपेल अशी अपेक्षा करुयात. या नवरात्रीत माता राणी यातून मार्ग काढेल अशी प्रार्थना करुयात.''
दुसऱ्या एका युजरने लिहिलंय, ''चांगली कल्पना आहे. अशी स्थिती येऊ नये अशी आशा करु. भारतातील लोकांनी नियम पाळण्याची खूप मोठी आवश्यकता आहे. #कोरोना वायरस #इंडियाफाइट्सकोरोनावायरस.''
''अशा प्रकारे रिकामे रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्सचाही उपयोग होऊ शकेल'', असे आणखी एका युजरने म्हटले आहे.
यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी कविता लिहून लोकांना २१ दिवस लॉकडाऊनचे पालन करण्याची विनंती केली होती. अमिताभ शिवाय शाहरुख खान, सलमान खान, अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, कॅटरिना कैफ, प्रियंका चोप्रा, शिल्पा शेट्टी इत्यादी सेलेब्स क्वारंटाइनमध्ये राहात आहेत. लोकांनी सेल्फ-आयसोलेशन, सेल्फ-क्वारंटाइन आणि सोशल डिस्टन्सिंगमध्ये राहण्याचे आवाहन करीत आहेत.