महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

बिग बी यांनी साईन केला सूरज बडजात्यांचा चित्रपट? - अमिताभ बच्चन

मेगास्टार अमिताभ यांनी सूरज बडजात्यांसोबत चित्रपट साईन केला आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाचे शुटिंग जानेवारीच्या पहिल्या तिमाहीत पार पडणार आहे.

Big B
बिग बी

By

Published : Dec 29, 2020, 8:01 PM IST

मुंबई- बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी निर्माता सूरज बडजात्यांच्या आगामी चित्रपटात काम करायचे ठरवले आहे. पुढील वर्षी या चित्रपटाचे प्रत्यक्ष शुटिंग सुरू होईल.

सध्या अमिताभ कौन बनेगा करोडपती या शोच्या १२ व्या पर्वाचे शुटिंग करीत आहेत. त्यांनी अजय देवगणच्या आगामी मेडे या चित्रपटाचेही साईन केले आहे. त्यानंतर ते राजश्री प्रॉडक्शन या नावाने परिचीत असलेल्या सूरज बडजात्यांच्या आगामी कौटुंबिक चित्रपटात भूमिका साकारतील.

राजश्री प्रॉडक्शनसुद्धा नायक सलमान खान याच्यासोबत पुन्हा चित्रपट करण्याच्या तयारीत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सूरजने सांगितले होते की सलमानसोबत तो एक प्रेमकथा पडद्यावर साकारणार आहे.

दरम्यान, अद्याप शीर्षक निश्चित नसलेला बिग बी यांचा आगामी चित्रपट २०२१ च्या पहिल्या तिमाहीत शुटिंग फ्लोरवर जाईल. बच्चन यंचा झुंड हा चित्रपट रिलीजच्या प्रतीक्षेत आहे. तसेच अयान मुखर्जींचा ब्रह्मास्त्र आणि प्रभास आणि दीपिका पादुकोण यांची मुख्य भूमिका असलेला एक शीर्षक नसलेला चित्रपट बच्चन यांच्या हातात आहे.

हेही वाचा - राजेश खन्नांच्या जन्मदिनीच ट्विंकलचा वाढदिवस, शेअर केला वडिलांसोबतचा फोटो

ABOUT THE AUTHOR

...view details