मुंबई - मेगास्टार अमिताभ बच्चन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. विविध विषयांवरील आपले अनुभव व विचार ते आपल्या चाहत्यासोंबत शेअर करतात. आज बिग बींनी 'स्वप्रेमा'विषयी आपल्या चाहत्यांना माहिती दिली. 'जे तुम्हाला आनंदी बनवेल तेच करा', असा सल्ला त्यांनी दिला आहे.
'स्व' प्रेमाविषयी काय म्हणाले बिग बी? - अमिताभ बच्चन स्व प्रेम ट्विट
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन नेहमी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते कधी आपल्या वडिलांचे तर, कधी आपले विचार चाहत्यांशी शेअर करत असतात.
!['स्व' प्रेमाविषयी काय म्हणाले बिग बी? Amitabh Bachchan](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9378285-1038-9378285-1604133674530.jpg)
बिग बींनी आपला एक फोटो ट्विटवर शेअर करत 'स्व-प्रेमा'विषय आपले विचार व्यक्त केले. 'दररोज सकाळी सर्वात अगोदर आपल्याला आपलाच सामना करावा लागतो. आपण नेहमी समोरच्यावर प्रभाव पाडण्यासाठी प्रयत्न करतो. मात्र, असे न करता तुम्हाला ज्या गोष्टीत आनंद मिळेल तीच गोष्ट करा', असे बच्चन म्हणाले. पोस्ट केलेल्या फोटोत बिग बी गडद निळ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये असून चित्रीकरणाच्या तयारीत असल्याचे दिसते.
सिनिअर बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. तीन दिवसांपूर्वी 'मोहब्बतें' चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाली. अमिताभ आणि शाहरुख खानची जुगलबंदी यात पाहायला मिळाली होती. अमिताभ यांनी एक व्हिडीओ शेअर करून चित्रपटाबद्दलच्या आठवणी जागवल्या होत्या. त्यापूर्वी त्यांनी आपल्या चाहत्यांना नवरात्रीच्या शुभेच्छाही दिल्या होत्या.