महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

चाहत्यांच्या प्रेमाने भारावले बिग बी, ट्विटरवर मानले आभार - बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावरुन पुन्हा एकदा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या तमाम चाहत्यांचे आभार मानले आहे. आपल्या मनातून हे प्रेम कधीच कमी होणार नाही असे त्यांनी म्हटलंय.

Big B
अमिताभ बच्चन

By

Published : Jul 25, 2020, 2:54 PM IST

मुंबई - बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन सध्या रुग्णालयात असून कोरोनाबाधा झाल्यामुळे उपचार घेत आहेत. त्यांचे चाहते मात्र सतत चिंतेत असून ते बरे व्हावेत यासाठी प्रार्थना करीत आहेत.

अमिताभ सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. चाहते व्यक्त करत असलेल्या प्रेमामुळे ते भारावले असून त्यांनी आभारही व्यक्त केले होते. अलिकडच्या एका ट्विटमध्ये अमिताभ यांनी चाहत्यांचे पुन्हा एकदा आभार मानले आहेत. यावेळी त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की आपल्या अंतःकरणातून लोकांचे प्रेम आणि पाठिंबा मिटवू शकत नाही. त्यांनी लिहिलंय, ''तुम्ही प्रेमाने आणि सहकार्यासाठी जे हात उचलले आहेत ती माझी ताकत आहे...मी हे माझ्यातून कधीच मिटवू देणार नाही...ईश्वराने माझी मदत करावी.''

इन्स्टाग्रामवरही आपले मत मांडताना बच्चन यांनी लिहिले आहे, ''हे जलसाचे फाटक बंद आहे, शांत आहे..परंतु आशेवर जग ठाम आहे...ईश्वराची इच्छा असेल तर पुन्हा एकदा प्रेमाने भरुन जाईल.''

हेही वाचा - 'हॉटस्टार'वर प्रदर्शित झाला 'दिल बेचारा'; सबस्क्रिप्शनशिवायही पाहता येणार..

अमिताभ यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे. कॉमेंट बॉक्समध्ये भरपूर प्रतिकिया येत आहेत. बिग बींच्या मनोकामना पूर्ण होतील अशा आशयांच्या प्रतिक्रिया चाहते देत आहेत.

कोरोना व्हायरसचे संक्रमण झाल्यामुळे संपूर्ण बच्चन परिवार रुग्णालयात आहे. त्यांचा मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या राय, नात आराध्या रुग्णालयात दाखल आहेत. जया बच्चन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details