महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

अमिताभने रचला इतिहास, १४ मिनिटांचा शॉट एक टेकमध्ये ओके - Resul Puketty

अमिताभ बच्चन यांनी चेहरे चित्रपटासाठी १४ मिनीटांचा सीन वन टेक पूर्ण केला. सीन संपल्यानंतर संपूर्ण टीमने उभे राहून त्यांचे अभिनंदन केले. बिग बी यांनी इतिहास रचल्याचे अनेकांनी म्हटलंय.

चेहरेच्या सेटवर अमिताभ बच्चन

By

Published : Jun 19, 2019, 4:27 PM IST

Updated : Jun 19, 2019, 4:48 PM IST

मुंबई - अभिनेता अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचा शहेनशाह म्हणतात. ही उपाधी त्यांना उगाच मिळालेली नाही. अत्यंत निष्ठेने ते दिग्दर्शकाला काय हवंय ते समजून घेतात आणि टेक देतात. अलिकडे 'चेहरे' चित्रपटाच्या शूटींगच्यावेळी त्यांनी कमाल करुन दाखवली. १४ मिनीटे लांबलचक डायलॉग त्यांना म्हणायचा होता. तो त्यांनी चक्क एकाच टेकमध्ये करुन दाखवला. यामुळे निर्मात्यासह सेटवरचे सर्वचजण अवाक झाले.

'चेहरे' चित्रपटासाठी १४ मिनीटांचा सीन बिग बी यांनी एकाच टेकमध्ये केल्यानंतर निर्माता आनंद पंडित यांनी अमिताभ यांचे कौतुक केले आहे. ते म्हणाले, "मी अशा एका चित्रपटाचा भाग आहे ज्यात एक ऐतिहासिक सीन आहे. चौदा मिनीटंचा सीन देणे केवळ अवघड नाही तर त्यासाठी समर्पणाची आवश्यकता असते. अमिताभ यांनी ती गोष्ट निपुणतेने पार पाडली. सेटवरचे वातावरण अत्यंत शांत होते. मात्र टेकनंतर टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. ते महान आहेत आणि आम्हां सर्वंसाठी ते प्रेरणादायी आहेत."

‘चेहरे’ हा एक रहस्यमय रोमांचक चित्रपट आहे. यात अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रुमी जाफरी याचे दिग्दर्शन करीत आहेत. आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि सरस्वती एंटरटेनमेंट प्राईवेट लिमिटेड याचे निर्माता आहेत.

साऊंड आर्टिस्ट रेसुल पूकेट्टी यांनीदेखील अमिताभ यांचे कौतुक केले आहे.

पूकेट्टी यांनी ट्विटरवर म्हटलंय, "आज अमिताभ बच्चन यांनी भारतीय सिनेमासाठी इतिहास रचला. शेवटच्या दिवशी 'चेहरे'चा शेवटचा शॉट...त्यांनी एकाच शॉटमध्ये १४ मिनीटांचा टेक पूर्ण केला आणि संपूर्ण टीमने उभे राहून टाळ्या वाजवल्या. प्रिय सर, निःसंशय तुम्ही जगातील सर्वात सर्वश्रेष्ठ व्यक्तींपैकी एक आहात."

यावर अमिताभ म्हणतात, "रेसुल ...मी जेवढ्या गोष्टीचा हक्कदार आणि किंवा माझी जेवढी योग्यता आहे त्याहून अधिक श्रेय तुम्ही मला दिलंय."

Last Updated : Jun 19, 2019, 4:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details