महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

रुग्णालयातून अमिताभ बच्चन घरी परतले, अॅडमिट होण्याचे कारण गुलदस्त्यात - Big B discharge from Nanavati hospital

अमिताभ बच्चन यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. सुमारे चार दिवस उपचार घेतल्यानंतर शुक्रवारी रात्री त्यांना घरी जाण्याची परवानगी मिळाली.

अमिताभ बच्चन घरी परतले

By

Published : Oct 19, 2019, 5:43 PM IST


मुंबई - बिग बी अमिताभ बच्चन यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली आहे. मंगळवारी पहाटे त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना नेमके काय झाले होते ही बाब गोपनीय ठेवण्यात आली होती. नियमित चेकअपसाठी ते रुग्णालयात दाखल झाल्याचे सांगण्यात येत होते. सुमारे चार दिवस उपचार घेतल्यानंतर शुक्रवारी रात्री त्यांना घरी जाण्याची परवानगी मिळाली.

मंगळवारी पहाटे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे त्यांचे चाहते चिंताग्रस्त झाले होते. मात्र त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर ते खूप मेहनत घेत असतात. गेल्या सिझनच्यावेळीही केबीसी सुरू असतानाच त्यांना रुग्णालयात भरती व्हावे लागले होते. इतकेच नाही तर केबीसीचे हे पर्व लवकर गुंडळण्यात आले होते. आताच्या पर्वात ते पूर्ववत कामावर रुजू होतात का पाहणे औत्सुक्याचे ठरु शकेल.


गेस्ट्रोन्ट्रोलॉजिस्ट डॉ. बारवे यांनी अमिताभ बच्चन यांच्यावर उपचार केले. १९८२ मध्ये ‘कुली’ चित्रपटादरम्यान अमिताभ बच्चन यांना पुनित इस्सार सोबत फाईट सीन करताना एक ठोसा पोटात बसला होता. या ठोशामुळे त्यांच्या यकृताला कायमची दुखापत झाली. आपलं यकृत केवळ २५ टक्केच कार्यरत आहे असं त्यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं. त्यांना जेव्हा दुखापत झाली होती त्यावेळी ‘हेपेटाइटिस बी’ने ग्रस्त असलेल्या रूग्णाचं रक्त त्यांना देण्यात आलं होतं, ज्यामुळे त्यांना यकृताचा त्रास सुरु झाला. आता नानावटी रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्यासोबत जया बच्चन आणि अभिषेक बच्चनही होते.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details