बिग बींनी केली देशभरातील डॉक्टर आणि नर्सची प्रशंसा, डेडीकेट केलं हे गाणं - amitabh bachchan latest twit
अमिताभ बच्चन यांनी यापूर्वी देखील कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी खबरदारी बाळगावी यासाठी वेळोवेळी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केले आहेत.
मुंबई - देशभरात पसरत चाललेला कोरोना विषाणू नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन बरेच प्रयत्न करत आहे. या सर्वांमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर्स, नर्स आणि इतर वैद्यकिय कर्मचारी हे आपले अमूल्य योगदान देत आहेत. त्यांची प्रशंसा करण्यासाठी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी एक पोस्ट शेअर करून त्यांच्यासाठी एक गाणे डेडीकेट केले आहे.
बिग बींनी एक पृथ्वीचा एक ग्राफिक फोटो पोस्ट केला आहे. सध्या या पृथ्वीचा भार डॉक्टर कशाप्रकारे आपल्या खांद्यावर घेत आहेत, असे दाखवणारे हे चित्र आहे. अशाच प्रकारे डॉक्टर्स देखील सध्या रुग्णांचा भार पेलत आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांच्या कुली चित्रपटातील गाणे सारी दुनिया का बोझ हम उठते हैं, हे डेडीकेट केले आहे.