मुंबई - नुकतंच 'भूल भूलैया २' चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं. ज्याला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. 'भूल भूलैया' सिनेमाला मिळालेल्या तुफान यशानंतर आता तब्बल ११ वर्षांनी या चित्रपटाचा सिक्वल येत आहे. यावर आता निर्माते भूषण कुमार यांची प्रतिक्रिया आली आहे.
...म्हणून 'भूल भूलैया'च्या सिक्वलला लागली ११ वर्ष, भूषण कुमारांचा खुलासा - कबीर सिंग
'भूल भूलैया' सिनेमाला मिळालेल्या तुफान यशानंतर आता तब्बल ११ वर्षांनी या चित्रपटाचा सिक्वल येत आहे. यावर आता निर्माते भूषण कुमार यांची प्रतिक्रिया आली आहे. अक्षय कुमारच्या 'भूल भूलैया' सिनेमाची निर्मिती केलेले भूषण कुमार म्हणाले, या सिनेमाच्या सिक्वलसाठी मी खूप उत्साही आहे
अक्षय कुमारच्या 'भूल भूलैया' सिनेमाची निर्मिती केलेले भूषण कुमार म्हणाले, या सिनेमाच्या सिक्वलसाठी मी खूप उत्साही आहे. आपण या चित्रपटाच्या सिक्वलसाठी एका उत्तम स्क्रीप्टची वाट पाहत होतो आणि अखेर ११ वर्षांनंतर मुराद भाई एक उत्तम स्क्रीप्ट घेऊन माझ्याकडे आले.
या सिनेमाचं दिग्दर्शन अनीस बझ्मी करणार असून मुराद भाई यांनी बझ्मी आणि भूषण कुमार यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्साही असल्याचं म्हटलं आहे. कबीर सिंगला मिळालेल्या तुफान यशानंतर भूषण कुमार आणि टी-सीरिजसोबत पुन्हा एकदा काम करण्याची संधी मिळाल्यानं आनंदी असल्याचंही त्यांनी म्हटलं. दरम्यान कार्तिक आर्यनची मुख्य भूमिका असलेला 'भूल भूलैया' २०२० मध्ये ३१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.