मुंबई- दम लगा के हैशा चित्रपटात निराळी भूमिका साकारल्यानंतर अभिनेत्री भूमी पेडणेकर आता एका नव्या लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच ती पती पत्नी और वो सिनेमाच्या रिमेकमध्ये झळकणार असून काही दिवसांपूर्वीच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.
भूमीनं शेअर केला 'पती पत्नी और वो'मधील आपला फर्स्ट लूक - दिवाळी
भूमीचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत, अशात आता भूमीने सिनेमातील आपला फर्स्ट लूक शेअर केला आहे. ये लडकी चक्का जाम करवा दे, असं कॅप्शन तिनं या फोटोला दिलं आहे.
भूमीचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत, अशात आता भूमीने सिनेमातील आपला फर्स्ट लूक शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये भूमी पाठमोरी उभी असून ये लडकी चक्का जाम करवा दे, असं कॅप्शन तिनं या फोटोला दिलं आहे. यात ती पारंपारिक वेशभूषेत दिसत आहे.
चित्रपटात भूमी वेदिका नावाचं पात्र साकारणार असून ती कार्तिक आर्यनच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार आहे. तर अनन्या पांडे कार्तिकच्या सेक्रेटरीच्या भूमिकेत दिसणार आहे. ६ डिसेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय भूमीचा सांड की आँख सिनेमाही येत्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे.