महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'भिड' या सिनेमासाठी अनुभव सिन्हांनी केली राजकुमार रावसह भूमी पेडणेकरची निवड - राजकुमार रावसह भूमी पेडणेकरची निवड

अनुभव सिन्हा दिग्दर्शित 'भिड' या आगामी चित्रपटासाठी भूमी पेडणेकरची निवड करण्यात आली आहे. मुल्क आणि आर्टिकल 15 सारख्या चित्रपटांसाठी ओळखल्या जाणार्‍या सिन्हा यांनी म्हटलंय की, भूमी पेडणेकर ही एक खात्रीशीर अभिनेत्री आणि स्वतःची विचारसरणी असलेली स्त्री असल्याने भिड चित्रपटासाठी ती योग्य होती.

अनुभव सिन्हांनी केली भूमी पेडणेकरची निवड
अनुभव सिन्हांनी केली भूमी पेडणेकरची निवड

By

Published : Oct 27, 2021, 10:53 PM IST

मुंबई(महाराष्ट्र): अभिनेत्री भूमी पेडणेकर हिला चित्रपट निर्माता अनुभव सिन्हा यांनी त्याच्या आगामी सामाजिक-राजकीय नाट्या असलेल्या भिड या चित्रपटासाठी निवडले आहे. यात राजकुमार राव तिचा सहकलाकार असेल. या चित्रपटाची निर्मिती सिन्हा आणि भूषण कुमार यांनी संयुक्तपणे केली आहे. यापूर्वी चित्रपट निर्मात्यांनी सिन्हा यांच्या थप्पड या चित्रपटाला पाठिंबा दर्शवला होता.

मुल्क आणि आर्टिकल 15 सारख्या चित्रपटांसाठी ओळखल्या जाणार्‍या सिन्हा यांनी म्हटलंय की, भूमी पेडणेकर ही एक खात्रीशीर अभिनेत्री आणि स्वतःची विचारसरणी असलेली स्त्री असल्याने भिड चित्रपटासाठी ती योग्य होती. तिच्याहून अधिक चांगल्या अभिनेत्रीचा शोध घेऊ शकलो नसतो. असे अनुभव सिन्हा यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय

सांड की आंख आणि डॉली किट्टी और वो चमक सितारे यांसारख्या चित्रपटातून वेगळ्या भूमिका साकारलेल्या भूमी पेडणेकरने सांगितले की, "चित्रपटांमध्ये मानसिकता बदलण्याची ताकद असते. कलाकार म्हणून, अशा कथा सांगण्याची जबाबदारी आपल्यावर असते. भूषण कुमार यांच्या बाबतीतही असेच आहे, जे निर्माता म्हणून आपल्या लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेत्यांना धैर्यवान बनू देतात."

सामाजिक-राजकीय नाट्य असलेल्या भिड या चित्रपटाचे शुटिंग लखनौमध्ये केले जाईल. अनुभव सिन्हा यांनी याची पूर्वतयारी सुरू केली आहे. नोव्हेंबरमध्ये हा चित्रपट फ्लोरवर जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - तब्बल ८३० किलोमीटर सायकल चालवत ‘जयंती’चे हटके आणि अनोखे प्रोमोशन!

ABOUT THE AUTHOR

...view details