मुंबई: भूमी पेडणेकरचा आगामी चित्रपट 'डॉली किट्टी और वो चमकते सीतारे' डिजिटल रिलीज होणार आहे. या निर्णयाचे तिने स्वागत तिने केलंय. हा प्लॅटफॉर्म सर्जनशील अभिव्यक्तीचे साधन असल्याचे भूमीला वाटते.
"एक कलाकार म्हणून मी प्रत्येक वेळी जेव्हा स्क्रीनवर असते तेव्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला पाहते आणि माझ्या सर्जनशील अभिव्यक्तीचे वाहन होण्यासाठी मला कोणतेही व्यासपीठ ठीक वाटते. आजच्या काळात निर्माते गरजेनुसार काम करीत असून आपण त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे, असे भूमी म्हणाली.
ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचेल असे भूमिला वाटते. अलंकृता श्रीवास्तव दिग्दर्शित, डॉली किट्टी और वो चमकते सितारे चित्रपटामध्ये कोंकणा सेन शर्मा देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. भूमी पेडणेकर ही कोंकणा आणि अलंकृता यांचीच खूप मोठी फॅन आहे
"डॉली किट्टी हा एक विशेष चित्रपट आहे. कोंकणा, आम्हाला माहित आहे की एक अभूतपूर्व व्यक्ती आणि अभिनेत्री आहे आणि अलंकृता (श्रीवास्तव) एक विशेष दिग्दर्शिका आहेत. निर्माते बालाजी मोशन पिक्चर्स नेहमीच आशयघन विषयाला पाठिंबा देत आले आहेत. याचमुळे एकता कपूर माझी आवडती असण्याचे कारण आहे. या चित्रपटाचा एक भाग असल्याने एक अभिनेत्री म्हणून माझ्यासाठी एक उत्कृष्ट समृद्ध करणारा अनुभव होता," असे ती म्हणाली.
हेही वाचा - श्रध्दा कपूरचे इन्स्टाग्रामवर ५० दशलत्क्ष फॉलोअर्स, स्वहस्ताक्षरात मराठीतून मानले चाहत्यांचे आभार
" कोंकणाचं काम मला खूप आवडलं आहे आणि तिचा अभिनय पाहून मी मंत्रमुग्ध होते. चित्रपटातील आमचे सीन्स रोमांचक आणि संस्मरणीय आहेत. आज अलंकृता सिनेमातील एक अतिशय शक्तिशाली आवाज आहे, ती शक्तीशाली, विनोदी आणि मानवी आहे. मी भाग्यवान की मला तिच्याबरोबर सर्जनशीलपणे काम करण्याची संधी मिळाली. तिच्याकडून मी बरेच काही शिकले, "भूमी म्हणाली.
"आमचा चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये नामांकन जिंकत आहे. आम्ही असा प्रेम आणि आदर मिळविला आहे. चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मी पुरस्कार जिंकले आहे आणि मला खात्री आहे की इथल्या प्रेक्षकांनाही आवडेल. लोक काय प्रतिक्रिया देतात हे पाहण्यासाठी मी आतुर झाली आहे. कॉलेजमधून फ्रेश बाहेर पडलेली आणि आयुष्याचा अनुभव घेण्याच्या प्रतीक्षेत असलेली मुलगी साकारणे तजेलादायक होते, " असे भूमी म्हणाली.