मुंबई- भूमी पेडणेकर सध्या आपल्या चित्रपटांच्या चित्रीकरणात चांगलीच व्यग्र आहे. 'सांड की आँख' आणि अमर कौशिकचं दिग्दर्शन असलेल्या 'बाला' चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करताच ती आता आपल्या आगामी चित्रपटासाठी लखनौला निघाली आहे. एअरपोर्टवरील आपला एक फोटो शेअर करत भूमीने याबद्दलची माहिती दिली आहे
'पती पत्नी और वो' असं शीर्षक असलेल्या या चित्रपटात ती कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. लखनौमधील बाला चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केल्यानंतर भूमी पुन्हा एकदा आगामी चित्रपटासाठी लखनौला जाणार आहे. पुन्हा एकदा लखौनकडे येत आहे. मात्र, यावेळी पती पत्नी और वोसाठी असं तिनं आपल्या फोटोसोबत दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.