मुंबई - करोना महामारीच्या लढाईमध्ये 'अॅन्टी स्पिटिंग' मोहिमेला पाठिंबा देण्याचे आवाहन अभिनेत्री भूमी पेडणेकरने केले आहे. कोरोना व्हायरस थुंकण्यामुळे पसरतो याची आठवण भूमीने करून दिली आहे.
भूमी म्हणाली, "आपल्याला कोरोना व्हायरसला हरवायचे आहे आणि यासाठी आपल्या सर्वांनी एकत्र आले पाहिजे. कुठेही थुंकण्याची सवय सोडून दिली पाहिजे. आपल्याला देश वाचवायचा आहे. सध्या आपला देश कोरोनाच्या संकटात अडकला आहे आणि हा जेवघेणा आजार थुंकण्यामुळे पसरतो."