मुंबई - अभिनेत्री भूमी पडणेकरची बहीण अगदी तिच्यासारखी दिसते हे अनेकांना माहिती नसेन. पण जेव्हा फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले, तेव्हा अनेकांना असा प्रश्न पडला की या दोघी बहिणी तर नाहीत? त्याचे झाले असे की, भूमीची बहीण समिक्षा हिने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोला तिने 'जस्ट अस', असे कॅप्शन दिले होते. हा फोटो भूमीने रिपोस्ट केला. त्यावर अनेक प्रतिक्रिया येऊ लागल्या.
एका चाहत्याने कॉमेंटमध्ये विचारले की, "तुम्ही दोघेही जुळ्या दिसत आहात." तर दुसऱ्याने लिहिले "जुडवा." त्यानंतर जुळ्यांच्या इमोजी असलेल्या चिन्हांचा वर्षाव सुरू झाला आणि पुन्हा भूमीला विचारणा होऊ लागली, "मी पुन्हा विचारत आहे, तुम्ही " भूमी आणि समिक्षा यांच्या वयामध्ये तीन वर्षांचे अंतर आहे. भूमी बॉलिवूडची लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्री असून समिक्षा वकील आहे. समिक्षाने तिच्या बहिणीची पोस्ट शेअर करीत कॅप्शनमध्ये लिहिले, "आमच्या स्वतःची एक भाषा आहे."