गेल्या वर्षी तान्हाजी मालुसरेचा बायोपिक केल्यानंतर अभिनेता अजय देवगण अजून एक बायोपिक घेऊन येतोय. ‘तान्हाजी : द अनसंग हिरो’ हा चित्रपट ऐतिहासिक काळातील होता आणि ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया' वॉर-फिल्म आहे. हा चित्रपट १९७१ साली घडलेल्या भारत-पाकिस्तान युद्धातील खऱ्या घटनेवर आधारित आहे. १४ दिवसांत ३५ वेळा हल्ला करून ९२ बॉम्ब्स आणि २२ रॉकेट्स वापरत पाकिस्तान ने हवाईअड्डा उध्वस्त केला होता. तेथील भुज विमानतळाचा कारभार पाहणारे निर्भय आयएएफ-स्क्वाड्रन विजय कर्णिक यांनी, आपल्या देशाच्या संरक्षणासाठी, मधापार तालुक्यातील स्थानिक खेड्यातील ३०० महिलांच्या मदतीने संपूर्ण आयएएफ-एअरबेसचे पुन्हा बांधकाम कसे केले हे या चित्रपटाद्वारे प्रेरणाप्रत दर्शविण्यात आले आहे.
‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया' या चित्रपटातून भुजमधील अनेक धाडसी लोकांनी भारताच्या विजयासाठी एकत्रितपणे कसे कार्य केले आणि एक मिलिटरी मिशन पूर्ण करण्यात कसा हातभार लावला याचे चित्रीकरण सजगपणे करण्यात आले आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या मोशन पोस्टर मधून हा चित्रपट सत्तरीच्या दशकात डोकावताना दिसतो. तसेच पॉवरफुल ॲक्शन, हृदय पिळवटणाऱ्या भावना व घटना, प्रेम आणि देशभक्ती हेदेखील यात ठासून भरलेले दिसते.