'भूल भुलैय्या' या गाजलेल्या चित्रपटाचा सीक्वेल आता निर्माणाधीन आहे. २००७ मध्ये आलेल्या या चित्रपटाचा पुढील भाग पुढील वर्षी ३१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस आणला जाईल. 'भूल भुलैय्या - २' मध्ये कार्तिक आर्यन, कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका असतील.
'भूल भुलैय्या -२' चित्रपटाचे दिग्दर्शन अनिस बाझ्मी करीत आहेत. या चित्रपटाचे शूटींग सुरू झाल्याची माहिती ट्रेंड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी सेटवरचे फोटो शेअर करीत दिली आहे. भूषण कुमार, मुराद केतानी आणि कृष्ण कुमार या सीक्लचे निर्माते आहेत.