महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'भूलभूलैया २'साठी या कलाकारांची नावं आली समोर, कोणाची लागणार वर्णी? - Ayushmann Khurrana

आता या सिनेमासाठी तीन आभिनेत्यांची नावं समोर येत आहेत. राजकुमार राव, विकी कौशल आणि आयुष्मान खुराणा यांची नावं या रोलसाठी शॉर्टलिस्टेट झाली असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

'भूलभूलैया २'साठी या कलाकारांची नावं आली समोर

By

Published : Jun 9, 2019, 8:56 PM IST

मुंबई- 'भूल भूलैया' या हॉरर चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर आता या चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात अक्षय कुमार आणि विद्या बालन यांच्या मुख्य भूमिका होत्या. अशात याच्या सिक्वलमधील कलाकारांबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती.

आता या सिनेमासाठी तीन आभिनेत्यांची नावं समोर येत आहेत. राजकुमार राव, विकी कौशल आणि आयुष्मान खुराणा यांची नावं या रोलसाठी शॉर्टलिस्टेट झाली असल्याचं वृत्त समोर आलं आहे. या तिन्ही कलाकारांची स्क्रीन टेस्ट होणार असून यातूनच एका अभिनेत्याची निवड करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हे तिन्ही कलाकार सध्याच्या घडीला आघाडीवर असून त्यांच्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवरील कमाल पाहता निर्मात्यांना यातील कोणा एकाचीच निवड करणं कठीण जात आहे. अशात आता चित्रपटात नेमकी वर्णी लागणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details