मुंबई (महाराष्ट्र)- कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांची प्रमुख भूमिका असलेला हॉरर कॉमेडी 'भूल भुलैया 2' चे मार्च रिलीज पुढे ढकलले आहे आणि आता 20 मे रोजी हा सिनेमा हॉलमध्ये रिलीज होईल, असे निर्मात्यांनी बुधवारी जाहीर केले. अनीस बज्मी दिग्दर्शित भूल भुलैया 2 सुरुवातीला 25 मार्च रोजी सिनेमा हॉलमध्ये रिलीज होण्याच्या तयारीत होता. ही तारीख आता एसएस राजामौली यांच्या बहुप्रतिक्षित आरआरआरने बुक केली आहे. "'भूल भुलैया 2' 20 मे 2022 रोजी तुमच्या जवळच्या सिनेमागृहात रिलीज होणार आहे," असे निर्मात्यांनी लिहिले आहे.
तब्बूचीही भूमिका असलेला हा चित्रपट भूषण कुमार, मुराद खेतानी आणि कृष्ण कुमार यांनी टी-सीरीज आणि सिने 1 स्टुडिओजच्या बॅनरखाली तयार केला आहे. फरहाद सामजी आणि आकाश कौशिक लिखित, भूल भुलैया 2 हा चित्रपट निर्माता प्रियदर्शनच्या 2007 मध्ये आलेल्या त्याच नावाच्या चित्रपटाचा सिक्वेल आहे ज्यामध्ये अक्षय कुमार आणि विद्या बालन होते.
दरम्यान, मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा आगामी स्पोर्ट्स चित्रपट झुंड अनेक विलंबानंतर 4 मार्च 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे, बुधवारी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर बिग बींनी रिलीज तारखेसह चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर केले. कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, "इस टोली से मुकाबला करने के लिए रहो तैयार! हमारी टीम आ रही है. झुंड तुमच्या जवळच्या सिनेमागृहात 4 मार्च 2022 रोजी रिलीज होत आहे."