मुंबई- बॉलिवूड भाईजान सलमान खान या ईदला 'भारत' हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला. भाईजानची ही भेटवस्तू मोठ्या आवडीनं स्वीकारत प्रेक्षकांनीही या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतलं. केवळ चार दिवसांतच भाईजानच्या या चित्रपटानं शतक पार केलं होतं.
'भारत'चं द्विशतक, केला २०० कोटींचा आकडा पार - katrina kaif
भाईजान सलमान खान या ईदला 'भारत' हा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'भारत' चित्रपटात सलमानच्या अपोझिट अभिनेत्री कॅटरिना कैफनं भूमिका साकारली आहे. आता चित्रपटाने द्विशतक करत २०१ कोटींचा गल्ला जमावला आहे

अशात आता चित्रपटाने द्विशतक करत २०१ कोटींचा गल्ला जमावला आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट शेअर करत चित्रपटाच्या कलेक्शनबद्दलची माहिती दिली आहे. सलमानच्या या चित्रपटानं अनेक नवे विक्रम रचले आहेत.
अली अब्बास जफरद्वारा दिग्दर्शित 'भारत' चित्रपटात सलमानच्या अपोझिट अभिनेत्री कॅटरिना कैफनं भूमिका साकारली आहे. तर दिशा पटानी सलमानच्या पहिल्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत चित्रपटात पाहायला मिळते. या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर पुढील ईदला सलमानचा 'ईन्शाअल्लाह' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून संजय लिला भन्साळी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.