मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री भाग्यश्री तिचा पहिला चित्रपट 'मैने प्यार किया' रिलीज झाल्यानंतर रातोरात स्टार बनली. मात्र प्रियकर हिमालय दसानीशी लग्न केल्यानंतर स्वतःला रुपेरी पडद्यापासून दूर ठेवणेच तिने पसंत केले. त्यांच्या विवाहाला दोन्ही बाजूंकडून विरोध होता. त्यामुळे मोठ्या संघर्षातून हे जोडपे एकत्र आले.
भाग्यश्री आणि हिमालयाचे 1990 मध्ये लग्न झाले. स्मार्ट जोडी या रिअॅलिटी शोमध्ये दिसणारे हे जोडपे राष्ट्रीय दूरचित्रवाणीवरील आठवणींच्या प्रदेशात फेरफटका मारुन आले. हिमालयाशी लग्न करण्यावर कुटुंबीयांचा आक्षेप होता हे आठवून भाग्यश्रीला शोमध्ये अश्रू आले. आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध त्यांना कसे लग्न करावे लागले याबद्दल बोलताना भाग्यश्रीला आपले अश्रू आवरता आले नाहीत.
अभिनेत्री भाग्यश्री म्हणाली, "माझ्या लग्नात माझ्या कुटुंबातील कोणीही हजर नव्हते आणि माझ्या पतीच्या बाबतीतही असेच होते. जेव्हा मी माझ्या पालकांना सांगितले की मला त्याच्याशी लग्न करायचे आहे, तेव्हा ते सहमत झाले नाहीत." भाग्यश्री पुढे म्हणाली की पालकांना त्यांच्या मुलांसाठी स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा असतात, परंतु त्यांनी मुलांना त्यांच्यासाठी सर्वोत्तम काय आहे हे निवडण्याची परवानगी दिली पाहिजे.