महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

BET Awards 2021: क्वीन लतीफाला लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड प्रदान - बीईटी अवॉर्ड्समध्ये क्वीन लतीफा हिला लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड

रविवारी लॉस एंजेलिसमध्ये पार पडलेल्या बीईटी अवॉर्ड्समध्ये क्वीन लतीफा हिला लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड प्रदान करण्यात आला. यावेळी रेड कार्पेटवर अनेक सेलेब्रिटीजने त्यांचे कौतुक केले.

queen latifa bet 2021 award
क्वीन लतीफाला लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड प्रदान

By

Published : Jun 28, 2021, 8:08 PM IST

लॉस एंजेलिस- ग्रॅमी-, एम्मी- आणि गोल्डन ग्लोब-विजेती क्वीन लतीफा हिला बीईटी अवॉर्ड्समध्ये लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड प्रदान करण्यात आला. रविवारी रात्री ती मायक्रोसॉफ्ट थिएटरमध्ये मंचावर येण्यापूर्वी अनेक कलाकारांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

"मला वाटते की पारंपरिक चौकट मोडून काढण्याची तिची क्षमता आहे. ती नेहमीच इतकी वेगळी होती परंतु त्याच वेळी इतकी खरी आणि वास्तविक आहे. ती सर्वांशी जोडली गेलेली आहे. असा प्रकारचे संतुलन पाहायला मिळणे अवघड आहे. म्हणूनच मला क्वीन लतीफा आवडते,'' असे एचईआरने म्हटले आहे.

क्वीन लतीफाला लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड प्रदान

“आपण क्वीन लतीफाहला एका विशिष्ट शैलीत जोखू शकत नाही कारण ती तिच्या प्रत्येक गोष्टीत आश्चर्यकारक आहे,” असे जॅझमिन सुल्लीवनने म्हटले आहे.

गेल्या वर्षभरात संगीत, खेळ आणि मनोरंजन क्षेत्रातील आफ्रिकन अमेरिकन लोकांसाठी ब्लॅक एंटरटेनमेंट टेलिव्हिजन नेटवर्कद्वारे बीईटी पुरस्कार आयोजित केले जातात.

हेही वाचा - 'रश्मिका'साठी फॅनची 900 किमी वारी: भेटी लागे जीवा 'मंदाना'ची आस, 'रश्मिका'साठी कायपण..!!

ABOUT THE AUTHOR

...view details