मुंबई- दिल्लीतील २००८ च्या ‘बाटला हाऊस’ चकमक प्रकरणावर आधारलेल्या बाटला हाऊस चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहम पोलीस अधिकारी संजय कुमार यादव यांची भूमिका साकारणार आहे. या चकमकीत संजय कुमार यादव यांनी पोलीस पथकाचे नेतृत्त्व केले होते
VIDEO: देशाला हादरवून टाकणाऱ्या एनकाऊंटरची कथा, 'बाटला हाऊस'चा ट्रेलर प्रदर्शित - action thriller
'बाटला हाऊस'मध्ये मारले गेलेले लोक दहशतवादी नसून ते निष्पाप विद्यार्थी असल्याचा दावा केला जात होता. हे विद्यार्थी खरचं निर्दोष होते का? सत्य नेमकं काय होतं, या सर्व गोष्टी चित्रपटातून मांडण्यात येत असून ट्रेलरमध्ये याचीच झलक पाहायला मिळत आहे.
![VIDEO: देशाला हादरवून टाकणाऱ्या एनकाऊंटरची कथा, 'बाटला हाऊस'चा ट्रेलर प्रदर्शित](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-3799743-thumbnail-3x2-john.jpg)
जामिया नगरच्या बाटला हाऊसमध्ये दहशतवादी असल्याचे कळल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने एक मोहीम राबवली होती, ज्यात दोन दहशतवादी मरण पावले होते. मात्र, काही राजकीय लोकांनी ही चकमक खोटी असल्याचे सांगितले होते. 'बाटला हाऊस'मध्ये मारले गेलेले लोक दहशतवादी नसून ते निष्पाप विद्यार्थी असल्याचा दावा केला जात होता.
हे विद्यार्थी खरचं निर्दोष होते का? सत्य नेमकं काय होतं, या सर्व गोष्टी चित्रपटातून मांडण्यात येत असून ट्रेलरमध्ये याचीच झलक पाहायला मिळत आहे. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाचं दिग्दर्शन निखील अडवाणीने केलं आहे. हा सिनेमा स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.