मुंबई- दिल्लीतील २००८ च्या ‘बाटला हाऊस’ चकमक प्रकरणावर आधारलेला 'बाटला हाऊस' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या पोस्टरनंतर आता याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या घटनेवर अनेक वेगवेगळ्या कथा रचल्या गेल्या. मात्र, यामागची खरी कथा अकरा वर्षांनंतर आम्ही तुमच्यासमोर मांडणारं आहोत, असं या टीझरमध्ये म्हटलं गेलं आहे.
त्या दिवशी बाटला हाऊसमध्ये नक्की काय झालं? आम्ही चुकीचे होतो? की मी चुकीचा होतो? असे जॉनचे शब्द या टीझरमध्ये ऐकायला मिळतात. या चित्रपटात जॉन अब्राहम पोलीस अधिकारी संजय कुमार यादव यांची भूमिका साकारणार आहे. या चकमकीत संजय कुमार यादव यांनी पोलीस पथकाचे नेतृत्त्व केले होते