महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'बरेली की बर्फी'ची २ वर्ष, दिग्दर्शिकेनं मानले प्रेक्षकांचे आभार - कंगना रनौत

या चित्रपटावर केलेल्या प्रेमाच्या वर्षावासाठी आणि मला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व प्रेक्षकांचे आणि चित्रपट प्रेमींचे आभार, असं तिनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराणा, राजकुमार राव आणि क्रिती सेनॉन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते.

बरेली की बर्फीची २ वर्ष

By

Published : Aug 18, 2019, 4:42 PM IST

मुंबई- 'बरेली की बर्फी' चित्रपटाला दोन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने दिग्दर्शिका आणि फिल्मफेअर पुरस्कार विजेती अश्विनी अय्यर तिवारी यांनी चित्रपटाच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर करत त्यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

या चित्रपटावर केलेल्या प्रेमाच्या वर्षावासाठी आणि मला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व प्रेक्षकांचे आणि चित्रपट प्रेमींचे आभार, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. मी आज जे काही आहे, केवळ तुमच्यामुळे आहे. आणखी बऱ्याच कथा तयार करून त्यातून आयुष्यभरासाठी काहीतरी शिकायचं आहे, असंही त्या पुढे म्हणाल्या.

या चित्रपटात आयुष्मान खुराणा, राजकुमार राव आणि क्रिती सेनॉन हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. दरम्यान अश्विनी लवकरच 'पंगा' चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या महिन्यातच या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून यात कंगना रनौत मुख्य भूमिकेत आहे. तर यात पंजाबी गायक जस्सी गिल, रिचा चड्ढा आणि निना गुप्ता यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details