मुंबई- बॉलिवूडमधील आपल्या अनेक चित्रपटांना अपयश आल्यानंतर आता अभिनेता इम्रान हाश्मीनं आपला मोर्चा वेबसीरिजकडे वळवला आहे. प्रेक्षकांचा सीरिजकडील वाढता कल पाहता, त्याने हा निर्णय घेतला असून लवकरच तो बार्ड ऑफ बल्ड या वेबसीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
भारतीय गुप्तहेराची कथा, बार्ड ऑफ बल्डचा ट्रेलर प्रदर्शित - गुप्त मोहिमेवर
या सीरिजमध्ये इम्रानने कबीर आनंद ही व्यक्तीरेखा साकारली आहे. कबीर आनंद हा भारतीय गुप्तचर खात्यामध्ये काम करणारा गुप्तहेर असून कबीरसह अन्य दोन व्यक्तींना एका गुप्त मोहिमेवर पाठविण्यात येते.
नेटफ्लिक्सच्या या सीरिजची निर्मिती शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेन्मेंटमार्फत केली जात आहे. नुकतंच या सीरिजचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. ज्यात शाहरुख आणि इम्रानचं संभाषण पाहायला मिळालं, यानंतर आता या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.
या सीरिजमध्ये इम्रानने कबीर आनंद ही व्यक्तीरेखा साकारली आहे. कबीर आनंद हा भारतीय गुप्तचर खात्यामध्ये काम करणारा गुप्तहेर असून पाकिस्तानमध्ये भारताचे चार गुप्तहेर पकडले जातात. या चार गुप्तहेरांना सोडवण्यासाठी कबीरसह अन्य दोन व्यक्तींना एका गुप्त मोहिमेवर पाठविण्यात येते. याचीच झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.