मुंबई - 'बहोत हुआ सन्मान' या आगामी हास्य चित्रपटाचे शूटींग मुंबईत सुरू झाले आहे. आशिष शुक्ला याचे दिग्दर्शन करीत असून यॉडली फिल्म्स याची निर्मिती करीत आहे.
खळखळून हसवण्यासाठी 'बहोत हुआ सन्मान'ची टीम लागली कामाला - Swanand Kirkire
'बहोत हुओ सन्मान' या चित्रपटाचे शूटींग सुरू झाले आहे. हा एक कॉमेडी चित्रपट असून हास्य कलाकारांची फौज यात पाहायला मिळेल.
![खळखळून हसवण्यासाठी 'बहोत हुआ सन्मान'ची टीम लागली कामाला](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4112882-thumbnail-3x2-jj.jpg)
बहोत हुआ सन्मान शूटींग सुरू
या धमाल चित्रपटात कलाकारांची मोठी टोळी पाहायला मिळणार आहे. संजय मिश्रा, राम कपूर, स्वानंद किरकिरे, राघव जुएल, नमित दास, फ्लोरा सैनी यांच्या यात प्रमुख भूमिका असून अभिषेक चौहान या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करीत आहे.
'बहोत हुओ सन्मान' या चित्रपटाचे शूटींग सुरू झाले असल्याची पोस्ट ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवर केली आहे.