मुंबई- 'बाहुबली' फेम प्रभास दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह जगभरात लोकप्रिय आहे. 'बाहुबली'च्या दोन्हीही भागांनी प्रभासला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे. या चित्रपटांनंतर प्रभास विशेष चर्चेत राहिला. प्रभासच्या फिल्मी करिअरचा टर्निंग पॉईंट ठरलेला हा चित्रपट त्याच्यासाठी नक्कीच खास असणार यात काही शंका नाही.
प्रभास म्हणतो, हा दिवस माझ्यासाठी नेहमीच भावनिक; 'बाहुबली २'ला २ वर्ष पूर्ण - ss rajamauli
प्रभासने नुकताच 'बाहुबली २' मधील एक फोटो शेअर करत त्याला खास कॅप्शन दिले आहे. निमित्त आहे 'बाहुबली'च्या प्रदर्शनाला २ वर्ष पूर्ण झाल्याचे.
प्रभासने नुकताच 'बाहुबली २' मधील एक फोटो शेअर करत त्याला खास कॅप्शन दिले आहे. निमित्त आहे 'बाहुबली'च्या प्रदर्शनाला २ वर्ष पूर्ण झाल्याचे. दोन वर्षांपूर्वी याच दिवशी 'बाहुबली : द कन्क्लुजन' चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा दिवस माझ्यासाठी नेहमीच भावनिक असेल. यासाठी मी एस. एस. राजामौली आणि संपूर्ण टीमचा ऋणी आहे. यासोबतच नेहमी माझ्यासोबत असणाऱया चाहत्यांचेही मी मनापासून आभार मानतो, असे प्रभासने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान सध्या प्रभास त्याच्या आगामी 'साहो' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सिनेमात तो अॅक्शन सीन करताना दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत श्रद्धा कपूरही झळकणार आहे. हिंदी, तेलुगू, तामिळ या भाषेंमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.