मुंबईः अनेक मोठ्या सुपरस्टार्सनंतर आता भारतीय सिंगर-रॅपर बादशाह आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने कोरोना व्हायरस निधीसाठी घोषणा केली आहे. त्यांनी पंतप्रधान निधीसाठी रक्कम दिली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि सिंगर-रॅपर बादशाह यांनीही मदत देऊ केलीय. शिल्पाने २१ लाख तर बादशाहने २५ लाखांची मदत दिली आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने ट्विटरच्या माध्यमातून याची माहिती दिलीय. तिने लिहिलंय, 'माणुसकीआता वेळ आहे. आपला देश आणि नागरिकांना आमची आवश्यकता आहे. चला प्रत्न करुयात.'
तिने पुढे लिहिलंय, '@therajkundra और मैं @narendramodi जी के पीएम-केयर्स फंडसाठी २१ लाख रुपये देण्याची मी शपथ घेते. थेंबा थेंबाने सागर बनतो. या स्थितीतून बाहेर पडण्याचे आवाहन करीत आहे. #इंडियाफाइट्सकोरोना @PMOIndia.'
इतर कलाकारांनीही पंतप्रधान निधीसाठी देणगी दिली आहे. यात अक्षय कुमार, गुरू रंधावा, भूषण कुमार, कपिल शर्मा आणि वरुण धवन यांची नावे अग्रणी आहेत. सुपरस्टार शाहरुख आणि आमिर खानने अद्याप याबद्दल जाहीर केलेले नाही. मात्र सलमान खानने २५ हजार रोजंदारीवरील कामगारांसाठी मदतीची घोषणा केली आहे.