मुंबई - आयुष्यमान खुराणाची दमदार भूमिका असलेला 'बधाई हो' चित्रपटाचा सीक्वल बनवणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी केली होती. यात भूमी पेडणेकरची नायिका म्हणून निवड होणार अशी आतापर्यंत चर्चा होती. मात्र आता ही गोष्ट पक्की असल्याचे ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करुन सांगितले आहे.
'बधाई दो'मध्ये राजकुमार राव आणि भूमी पेडणेकरची जोडी पक्की - राजकुमार राव
'बधाई दो' हा 'बधाई हो'चा सीक्वेल असणार आहे. यामध्ये राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांच्या भूमिका असतील. ही गोष्ट पक्की असल्याचे ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विट करुन सांगितले आहे.

राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर
तरण आदर्श यांनी ट्विटरवर लिहिलंय, '' 'बधाई दो' हा 'बधाई हो'चा सीक्वेल असणार आहे. यामध्ये राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांच्या भूमिका असतील..हर्षवर्धन कुलकर्णी दिग्दर्शन करणार का यावर त्यांनी प्रश्नचिन्ह टाकले आहे....'जंगली पिक्चर्स'ची निर्मिती असलेला 'बधाई दो'चे शूटींग २०२१ च्या जानेवारीत सुरू होईल.''
'बधाई हो'च्या सीक्वलचे नाव 'बधाई दो' असे असणार आहे. 'बधाई दो' हा चित्रपट खुसखुशीत कॉमेडी चित्रपट असेल.