मुंबई (महाराष्ट्र)- अभिनेता राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर जे गुपित राखण्याचा प्रयत्न करीत होते ते गुपित अखेरीस उघड झाले आहे. 'बधाई दो' या चित्रपटाच्या निर्मात्यांनी मंगळवारी सकाळी ट्रेलर रिलीज झाल्यामुळे हे रहस्य उलगडले आहे.
तीन मिनिटे आणि सहा सेकंदांचा ट्रेलर राजकुमार आणि भूमी यांच्यातील वैवाहिक जीवनाभोवती फिरतो. या दोघांच्या वैवाहिक जीवनात अनेक रहस्ये लपली आहेत.
ते दोघेही LGBTQ+ समुदायातील आहेत हे गुपित दोघे एकमेकांना उघड करतात. सोयीनुसार लग्न करणे आणि रूममेट म्हणून राहणे असे ते ठरवतात. पण यातून जे विनोदी प्रसंग निर्माण होतात त्यामुळे एक परिपूर्ण कौटुंबिक मनोरंजन होते.
यात केवळ कॉमेडी आणि भावनांची रेलचेल नाही तर कौटुंबीक आणि सामाजिक विषयावरही भाष्य आहे. याची झलक आपल्याला ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.
ट्रेलरला एका कॅप्शनसह पोस्ट करण्यात आले आहे, "प्रेमाच्या महिन्यात अतरंगी लग्नाच्या सतरंगी सेटिंगचे साक्षीदार व्हा! बधाई दो 11 फेब्रुवारी, 2022 रोजी सिनेमागृहात येत आहे"
हर्षवर्धन कुलकर्णी दिग्दर्शित हा चित्रपट या वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार्या कौटुंबिक मनोरंजनांपैकी एक आहे. राजकुमार आणि भूमी व्यतिरिक्त, कौटुंबिक मनोरंजनासाठी सीमा पाहवा, शीबा चड्ढा, चुम दरंग, लव्हलीन मिश्रा, नितीश पांडे आणि शशी भूषण यांसारख्या प्रतिभावान कलाकारांचा समावेश आहे.
हेही वाचा -वाढदिवस साजरा न केल्याबद्दल इरफान खानला अखेर सुतापा सिकदरने केले 'माफ'