मुंबई - बॉलिवूडचा 'बॅड मॅन' अशी ओळख असलेल्या गुलशन ग्रोव्हर यांचा एक जुना फोटो व्हायरल झालाय. १९९० च्या या फोटोत गुलशनसोबत शाहरुख खान आणि आमिर खान दिसत आहेत. गेली ३९ वर्षे रुपेरी पडद्यावर असंख्य खलनायक साकारलेल्या गुलशन ग्रोव्हर यांनी आजवर ४०० चित्रपटातून भूमिका केल्या आहेत. तसेच त्यांनी काह हॉलिवूड चित्रपटातही भूमिका केल्या आहेत.
'बॅड मॅन'चा शाहरुख - आमिरसोबतचा जुना फोटो व्हायरल, गुलशनपुढे भांबावलेत सुपरस्टार - Aamir Khan
गुलशन ग्रोव्हर, आमिर खान आणि शाहरुख खान यांचा एक जुना फोटो व्हायरल झालाय. १९९० च्या या फोटोवर सध्या भरपूर प्रतिक्रिया येत आहेत. गुलशन ग्रोव्हर यांनी आतापर्यंत तब्बल ४०० चित्रपटातून काम केलंय. लवकरच त्यांचा बायोपिक रिलीज होणार आहे.
व्हायरल झालेल्या या फोटोत शाहरुख खान आणि आमिरच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे आहेत. यात असे वाटते की गुलशन ग्रोव्हर, आमिर आणि शाहरुखला काही तरी समजावून सांगत आहेत. यात शाहरुख शांतपणे ऐकत असून आमिर थोडासा विचलीत झाल्याचे दिसत आहे. लोक या फोटोवर आपल्या भरपूर प्रतिक्रिया देत आहेत.
'हम पांच' या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केलेल्या गुलशन ग्रोव्हर यांनी अनेक भूमिका साकारल्या. १९८९ मध्ये आलेल्या 'राम लखन' चित्रपटानंतर त्यांची ओळख बॅड मॅन अशी झाली. त्यांनी 'द सेकेंड जंगल बुक' या सारख्या काही आंतरराष्ट्रीय चित्रपटातूनही काम केले आहे. आता लवकरच 'बॅड मॅन' हा त्यांच्यावर आधारित रोजमिला भट्टाचार्य यांनी लिहिलेला बायोपिक रिलीज होणार आहे.