महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

पाहा, 'बच्चन पांडे' ट्रेलरमधील अक्षय कुमारचा घातक अवतार - बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार

आगामी क्राईम-अ‍ॅक्शन-कॉमेडी ''बच्चन पांडे''चा ट्रेलर रिलीज झाला आहे. लार्जर-दॅन-लाइफ व्हिज्युअल आणि याआधी कधीही न पाहिलेल्या अक्षय कुमारच्या घातक अवतार यात पाहायला मिळत आहे.

अक्षय कुमारचा घातक अवतार
अक्षय कुमारचा घातक अवतार

By

Published : Feb 18, 2022, 2:28 PM IST

मुंबई- बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार या होळीला त्याचा आगामी चित्रपट बच्चन पांडेसह प्रेक्षकांना भुरळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. आगामी क्राईम-अॅक्शन-कॉमेडीची जगाची झलक शेअर करत निर्मात्यांनी शुक्रवारी बच्चन पांडेचा ट्रेलर रिलीज केला.

ट्रेलर पाहता अक्षय बच्चन पांडे नावाच्या देसी गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याची कथा चित्रपट निर्मातीची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या क्रिती सॅनॉनला आकर्षित करते. अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा आणि बरेच कलाकार यात दिसून येतात. या चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस देखील अक्षयच्या मैत्रिणीच्या भूमिकेत आहे जिचा अखेरीस त्याच्याकडून खून होतो.

'बच्चन पांडे' हा अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स आणि ड्रामाने भरलेला चित्रपट दिसत आहे. फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियादवाला आणि वर्दा खान नाडियादवाला यांनी केली आहे. फरहाद हाऊसफुल 3, हाऊसफुल 4, सिंघम (पटकथा लेखक) यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखला जातात.

बच्चन पांडे हा अक्षय कुमारचा साजिदच्या नाडियादवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंटसह दहावा चित्रपट आणि बॅनरखाली जॅकलिनचा आठवा चित्रपट आहे. हा चित्रपट यावर्षी 18 मार्चला होळीच्या मुहूर्तावर सिनेमागृहात दाखल होणार आहे.

हेही वाचा -Farhan Shibani Wedding: धर्मनिरपेक्ष राहून फरहान आणि शिबानी करणार संसार

ABOUT THE AUTHOR

...view details