मुंबई- गणेशोत्सवाला सुरुवात झाल्यापासून काही मानाच्या समजल्या जाणाऱ्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी भक्तांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. यात कलाकारही मागे नाहीत. नुकतंच बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.
अंबानी आणि बच्चन कुटुंबीयांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन - लालबागचा राजा
अमिताभ यांनी मुलगा अभिषेकसोबत याठिकाणी आज (रविवारी) आरतीसाठी हजेरी लावली. तर मुकेश अंबानी हे आपल्या आकाश आणि अनंत या मुलांसोबत आणि सुन श्लोकासोबत याठिकाणी आले होते.
अंबानी आणि बच्चन कुटुंबीयांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन
अमिताभ यांनी मुलगा अभिषेकसोबत याठिकाणी आज (रविवारी) आरतीसाठी हजेरी लावली. तर मुकेश अंबानी हे आपल्या आकाश आणि अनंत या मुलांसोबत आणि सुन श्लोकासोबत याठिकाणी आले होते. यावेळी त्यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेत आरती केली.
दरम्यान लालबागच्या राजाचा दरवर्षी काहीतरी संदेश देणारा आकर्षक देखावा असतो. त्यामुळे यावर्षी काय नवी संकल्पना वापरली जाणार, याची अनेकांच्या मनात उत्सुकता होती. यावर्षी या बाप्पासाठी इस्रोच्या चांद्रयान २ मोहिमेचा देखावा केला गेला आहे.