महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

कलाकारांवर चढला होळीचा रंग, पाहा सेलिब्रेशनचे फोटो - tapsee pannu celebrates Hol

कलाविश्वात मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात आली. तर, रंग खेळून धुळवडीचाही आनंद कलाकारांनी लुटला. रंगात रंगलेल्या कलाकारांच्या फोटोंची सोशल मीडियावरही क्रेझ पाहायला मिळाली.

B town Celebs celebrates Holi with family
कलाकारांवर चढला होळीचा रंग, पाहा सेलिब्रेशनचे फोटो

By

Published : Mar 11, 2020, 1:50 AM IST

मुंबई - होळी आणि धुळवडीनिमित्त रंग खेळण्याची एक वेगळीच मजा असते. कलाविश्वातही मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात आली. तर, रंग खेळून धुळवडीचाही आनंद कलाकारांनी लुटला. रंगात रंगलेल्या कलाकारांच्या फोटोंची सोशल मीडियावरही क्रेझ पाहायला मिळाली.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास होळी साजरी करण्यासाठी भारतात आले होते. निकने प्रियांकासोबत पहिल्यांदाच होळीचा आनंद लुटला. होळीच्या रंगात रंगून दोघांनीही सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले आहेत.

प्रियांका चोप्रा, निक जोनास

अभिनेत्री करिश्मा कपूरनेही इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. तिने आपल्या दोन्ही मुलांसोबत रंग खेळले. 'रियल लाईफ मेंटल मॉम', असे कॅप्शन तिने या फोटोवर दिले आहेत. लवकरच ती 'मेंटलहुड' या वेबसीरिजमधून वेबविश्वात पदार्पण करणार आहे.

करिश्मा कपूर

गायिका नेहा कक्करने आपल्या गायनासोबतच आपल्या गोड हास्याने आणि साधेपणाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नेहमीप्रमाणे साधेपणाने तिने होळी साजरी केली.

नेहा कक्कर

अभिनेत्री तापसी पन्नूनेही सोशल मीडियावर रंगात रंगलेला फोटो शेअर केला आहे. 'होली हॅपीनेस' असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे.

तापसी पन्नू

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानेही होळीच्या रंगात रंगलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

सोनाक्षी सिन्हा

दीपिका पदुकोणचाही कुल लुक पाहायला मिळाला.

दीपिका पदुकोण

अभिनेता आमिर खानने पत्नी किरण रावसोबत आपल्या होळीच्या सेलिब्रेशचे फोटो शेअर केले आहेत. तसेच त्याने चाहत्यांनाही होळीच्या शुभेच्छा दिल्या.

किरण राव

अभिनेता कुणाल खेमूने तब्बल १२ वर्षानंतर होळीचा आनंद लुटला. याचे श्रेय त्याने त्याची मुलगी इनायाला दिले आहे. कुणाल इनायासोबतचे बरेच फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतो.

कुणाल खेमू

सोहा अली खाननेही पती आणि मुलीसोबत होळी साजरी केली.

सोहा अली खान

ABOUT THE AUTHOR

...view details