मुंबई- गेल्या आठवडाभरापासून संपूर्ण देशभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याच निमित्ताने अनेक बॉलिवूड कलाकारही मुंबईतील प्रसिद्ध गणपतींचे दर्शन घेतले आहे. यात अभिनेत्री कंगना रनौत आणि दीपिका पदुकोणचाही समावेश आहे. कंगनानं नुकतंच बहिण रंगोलीसोबत प्रसिद्ध अंधेरीच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी तिनं देवाकडं मागणंही मागितलं.
मुंबईत बाप्पाच्या दर्शनासाठी कलाकारांची मांदियाळी - deepika padukone
अनेक बॉलिवूड कलाकार मुंबईतील प्रसिद्ध गणपतींचे दर्शन घेतेले. यात अभिनेत्री कंगना रनौत आणि दीपिका पदुकोणचाही समावेश आहे. कंगनानं नुकतंच बहिण रंगोलीसोबत प्रसिद्ध अंधेरीच्या राजाचं दर्शन घेतलं.
बाप्पाच्या दर्शनासाठी कलाकारांची मांदियाळी
तर दुसरीकडे काही महिन्यांपूर्वीच विवाहबंधनात अडकलेली नववधू दीपिका हिनेदेखील लाल बागच्या राजाचं दर्शन घेतलं. यावेळी दीपिकाला पाहण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी झाली होती.