मुंबई- बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग त्याच्या होम टाऊन चंदीगडमध्ये करणार आहे. यासाठी तो खूपच उत्साहित झाला आहे. ही प्रक्रिया त्याच्यासाठी खूप खास असल्याचे त्याला वाटतंय.
आयुष्मान म्हणाला, "हे आश्चर्यकारक आहे की मी चंदीगढमध्ये पहिल्यांदाच शूटिंग करणार आहे. ही प्रक्रिया खूप खास असणार आहे आणि मी या अनुभवाच्या प्रत्येक सेकंदाचा आनंद घेणार आहे."
तो म्हणाला, "चंदीगढ हे एक असे शहर आहे ज्याने मला अभिनेता होण्याच्या उत्कटतेची जाणीव करुन देण्यासाठी पंख दिले."
आयुष्मान म्हणतो की, त्याने जेव्हा नाटकात काम करण्यास सुरूवात केली होती तेव्हा चंदीगडच्या लोकांनी त्याला भरपूर प्रेम आणि विश्वास व्यक्त केला होता. आपले अभिनेता बनण्याचे बीज इथेच अंकुरल्याचे त्याने म्हटलंय.
अभिषेक कपूरच्या 'चंडीगड करे आशिकी' या रोमँटिक चित्रपटात आयुष्यमान आणि वाणी कपूरची जोडी झळकणार आहे.