महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आयुष्यमान आणि विकी कौशलने आपल्या सिनेमांच्या रिलीजपूर्वी केला 'ब्रोमान्स' - Vicky Kaushal latest news

आयुष्यमान आणि विकीचे चित्रपट आज रिलीज होत आहेत. यापार्श्वभूमीवर दोघांनीही एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त केलं..

Ayushyaman and Vicky
आयुष्यमान आणि विकी कौशल

By

Published : Feb 21, 2020, 3:05 PM IST

आयुष्यमान खुराणा आणि विकी कौशल यांचे चित्रपट आज बॉक्स ऑफिसवर दाखल झालेत. खरंतर दोन्ही चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर होणार आहे. मात्र दोघांनीही आपले मित्रप्रेम दाखवून देत एक वेगळा आदर्श घातलाय.

आयुष्यमान खुराणाचा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' आणि विकी कौशलचा 'भूत: द हॉन्टेड शिप' आज रिलीज झाले आहेत. दोघांचेही फॅन फॉलोविंग मोठे आहे. मात्र दोघांनी ब्रोमान्स करीत एकमेकांशी स्पर्धा नसल्याचे दाखवून दिल्याने चाहते सुखावले आहेत.

सर्वात पहिल्यांदा आयुष्यमानने विकी कौशलसोबतचा फोटो शेअर करीत लिहिले, 'एक ही दिन हम दोनों भी आ रहे हैं, ढेर सारा प्यार और सम्मान, लेकर आ रहे हैं विक्की और आयुष्मान, भूत और शुभ मंगल ज्यादा सावधान.'

यानंतर विकीनेही आयुष्यमानचा स्वतःसोबतचा फोटो शएअर करीत कॅप्शनमध्ये लिहिले, 'कल से आपके नजदीकी सिनेमा घरों में...शुभ मंगल ज्यादा सावधान...भूत.'

दोन्ही चित्रपटांचे विषय पूर्णतः वेगळे आहेत. त्यामुळे ज्या प्रेक्षकांना जो जॉनर आवडेल ते तो पाहून शकतात. दोन्ही अभिनेते यशाची शिखरे गाठत आहेत. दोघांनीही एकमेकांच्या सिनेमांना शुभेच्छा दिल्याचे दिसत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details