महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

आयुष्मानने 'अनेक'चे शुटिंग संपवले, शेवटच्या दिवशी भावनिक झाल्याचा केला खुलासा - आयुष्मान खुरानाचा आगामी चित्रपट

आयुष्मान खुराना आणि अनुभव सिन्हा यांनी त्यांच्या आगामी 'अनेक' या चित्रपटाचे शूटिंग नवी दिल्लीत संपवले आहे. शूटिंगच्या शेवटच्या दिवशी आपण का भावनिक झालो होतो याचा खुलासा आयुष्मानने पोस्ट लिहून केला आहे.

Ayushmann wraps Anek
आयुष्मानने 'अनेक'चे शुटिंग संपवले

By

Published : Mar 20, 2021, 7:13 PM IST

मुंबई - 'चंदीगड करे आशिकी' चित्रपट पूर्ण केल्यानंतर अभिनेता आयुष्मान खुरानाने आणखी एका चित्रपटाचे शुटिंग पूर्ण केले आहे. शनिवारी आयुष्मानने 'अनेक' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्याचे जाहीर केले. याचे शुटिंग दिल्लीत सुरू होते.

आयुष्मानने मंगळवारी शुटिंगसाठी दिल्लीला जात असल्याचे चाहत्यांना कळवले होते. यावेळी त्याने शुटिंगच्या सेटवरील काही क्षण शेअर केले होते.

फोटोच्या कॅप्शनमध्ये आयुष्मानने लिहिले, '' 'अनेक'चे शुटिंग संपले आहे. 'अनेक' खूप खूप खास आहे. हा चित्रपट म्हणजे भरपूर आश्चर्य असलेला चित्रपट आहे. कुणीही स्पर्श न केलेल्या विषयावरचा हा चित्रपट असून हा एक अतिशय महत्त्वाचा नवीन युगाचा सिनेमा आहे."

शूटच्या शेवटच्या दिवशी तो भावनिक का झाला, याचा खुलासा आयुष्मानने पुढे केला आहे. तो म्हणतो, ''कारण मला अशी व्यक्तीरेखा साकारायला पुन्हा मिळणार नाही. मी जोशुआची भूमिका साकारु शकणार नाही. मी नॉर्थ ईस्टला मिस करतोय.''

कॅप्शनच्या शेवटी आयुष्मानने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या आपल्या फोटोंच्या मालिकेचे वर्णन लिहिले आहे.

पहिल्या फोटोचे वर्णन करताना त्याने लिहिलंय, हा "चित्रपटाचा शेवटचा शॉट" आहे. दुसरा फोटो दिग्दर्शक अनुभव सिन्हासोबतचा आहे. तिसऱ्या फोटोत अनेक चित्रपटाची टीम दिसत आहे. चौथ्या फोटोत त्याने शेटवटच्यावेळी स्वतःची स्टेशनरी सिनेमासाठी वापरली आहे.

अनुभव सिन्हा दिग्दर्शित आयुष्मान खुरानाची भूमिका असलेला आगामी चित्रपट येत्या १७ सप्टेंबर, २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. या दोघांचा हा एकत्रीत दुसरा चित्रपट आहे. त्यांनी यापूर्वी 'आर्टिकल १५' हा गाजलेला चित्रपट दोघांनी बनवला होता.

हेही वाचा - राम गोपाल वर्माचा 'डी कंपनी' रिलीज न होण्याचे 'हे' आहे खरे कारण!!

ABOUT THE AUTHOR

...view details