महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

नव्या सिनेमात संपूर्ण नव्या अवतारात झळकणार आयुष्यमान खुराना - अभिषेक कपूर दिग्दर्शित

बॉलिवूडचा अभिनेता आयुष्मान खुराना त्याच्या पुढच्या चित्रपटात क्रॉस-फंक्शनल एथलीटची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक कपूर करणार असून यात आयुष्यमान संपूर्ण वेगळ्या अवतारात पाहायला मिळणार आहे.

Ayushmann
आयुष्यमान खुराना

By

Published : Jul 29, 2020, 12:39 PM IST

मुंबईःअभिनेता आयुष्मान खुराना अभिषेक कपूर दिग्दर्शित आगामी चित्रपटात क्रॉस-फंक्शनल एथलीटची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाची प्रगतीशील प्रेमकथा आहे. उत्तर भारताच्या पार्श्वभूमीवर ही कथा गुंफण्यात आली असून ऑक्टोबरमध्ये याचे शूटिंग सुरू होईल.

"आयुष्मान आणि मी दोघेही एका विशिष्ट सिनेमासाठी ओळखले जातो आणि हा चित्रपट नक्कीच आम्ही दोघांसाठीही खास आहे. प्रेक्षकांनी चित्रपटगृहात परत यावं आणि एक समुदाय म्हणून चित्रपट बघावा अशी आमची इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही कसलीही कसर सोडणार नाही. यासाठी सर्वोत्तम खेळ आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.” असे अभिषेक यांनी म्हटले.

चित्रपट निर्मात्याने सांगितले की, यापूर्वी कधीही न पाहिलेल्या रुपात आयुष्यमानला सादर करणार आहे.

"आयुष्मान चित्रपटात क्रॉस-फंक्शनल एथलीटची भूमिका साकारत आहे आणि यासाठी त्याला यापूर्वी न केलेले शारीरिक परिवर्तन घडवून आणावे लागणार आहे. हे खूपच मोठे आव्हान आहे आणि तो यासाठी वचनबद्ध आहे," असे अनेक गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी म्हटलंय.

हेही वाचा - कोरोनाने तुझा मृत्यू व्हावा.. हेटर्सच्या वाक्याने भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले..

अभिषेक कपूरसोबत काम करण्यासाठी आयुष्यमान उत्सुक आहे. यासाठी तो मेहनत घेऊन आपल्या शरिराचे परिवर्तन करणार आहे.

"आज सिनेमामध्ये अभिषेकचा वेगळा आवाज आहे आणि मला मनापासून आवडलेल्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळतेय याचा मला आनंद होतोय. हा एक संपूर्ण कौटुंबिक मनोरंजन असलेला चित्रपट असून यात प्रेक्षकांना भावनिक आनंद मिळवता येणार आहे. हे एक सुंदर कथा असून तुमच्या ह्रदयाला स्पर्श करणारी आहे,'' असे आयुष्यमानने सांगितले.

या चित्रपटासाठी एक एथलिट खेळाडू म्हणून आयुष्यमानला शरिरात प्रचंड बदल करावे लागणार आहेत. यासाठी प्रचंड मेहनत घेण्याची तयारी त्याने केली आहे. त्यामुळे हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित होईल तेव्हा एका वेगळ्या अवतरातील आयुष्यमान आपल्याला पाहायला मिळेल.

पुढील वर्षी चित्रपट जगभरात चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details