मुंबई - बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना यांनी आपल्या आगामी ‘गुलाबो सीताबो’ चित्रपटावरुन प्रेरित कोविड -१९ मीम्सवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मुंबई पोलिसांनी 'गुलाबो सिताबो'चा मीम केला शेअर, आयुष्यमाननेही दिली प्रतिक्रिया - आयुष्यमाननेही दिली प्रतिक्रिया
आयुष्मान खुरानाचा आगामी चित्रपट 'गुलाबो सीताबो'चा एक मीम मुंबई पोलिसांनी आपल्या अधिकृत खात्यावर शेअर केला आणि सर्वांना त्यांच्या घरीच रहाण्याचे आवाहन केले. या ट्वीटवर आयुष्मान यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की, "परफेक्ट डीजीपी महाराष्ट्र पोलीस, बाहेर न जाणे घरी राहणे सुरक्षित आहे."
हे मीम मुंबई पोलिसांनी शेअर केले आहे. मुंबई पोलिसांनी चित्रपटाचे एक दृश्य त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरुन ट्वीट केले आहे, ज्यात आयुष्मान सहकलाकार अमिताभ बच्चनसोबत दिसला आहे. मुंबई पोलिसांनी कॅप्शनमध्ये मराठी भाषेत लिहिले आहे, “घर तुमचं, जमीन तुमची, मर्जी तुमची, पण बाहेर जाण्याची "परमिशन" आमची घ्यावी लागेल. कोरोना विषाणूपासून सर्वात सुरक्षित ठिकाण आहे तुमची स्वतःची "हवेली". विनाकारण बाहेर जाऊ नका, सुरक्षित राहा.#StayHome #StaySafe
आयुषमानने ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त केली की, “परफेक्ट डीजीपी महाराष्ट्र पोलीस, घरीच राहणे सुरक्षित आहे, बाहेर जाऊ नका.” मुंबई पोलिसांनी बॉलिवूड चित्रपटाचे संवाद आणि दृष्ये जनजागृतीसाठी पाठवण्याची ही पहिली वेळ नाही. त्याने यापूर्वीही अनेक चित्रपटांच्या काही भागांसह 'मैं हूं ना' आणि 'स्त्री' सारख्या चित्रपटांमधील संवाद आणि सीन्स यांचा समावेश केला आहे.