मुंबई- आयुष्मान खुराणा आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका असलेला 'शुभ मंगल सावधान' चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर आता याचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'शुभ मंगल ज्यादा सावधान' असं या चित्रपटाचं शीर्षक असणार आहे.
आयुष्मानच्या 'शुभ मंगल सावधान'च्या सिक्वलची तयारी, अशी असेल कथा - shubh mangal zyada savdhan
चित्रपटाची कथा समलैंगिक संबंधांवर आधारित असणार आहे. त्यामुळे, या कथेत आता कोणता नवा ट्विस्ट येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'शुभ मंगल सावधान'च्या सिक्वलची तयारी
हितेश केवल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर आनंद एल राय यांची निर्मिती असणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दलची अधिकृत घोषणा केली आहे. मात्र, चित्रपटाचा हा भाग पहिल्या भागापेक्षा वेगळा असणार आहे.
चित्रपटाची कथा समलैंगिक संबंधांवर आधारित असणार आहे. त्यामुळे, या कथेत आता कोणता नवा ट्विस्ट येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.