मुंबई- अभिनेता आयुषमान खुराणाने 'विकी डोनर'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याच्या या चित्रपटाने प्रेक्षकांना खळखळून हसवणे आणि मनोरंजनाशिवाय एक संदेशही दिला. आयुषमानचा आयुष्यातील खऱ्या अर्थाने महत्त्वाचा असणाऱ्या या चित्रपटाला आता ७ वर्षे पूर्ण झाली आहेत.
दुसऱ्यांदा 'विकी डोनर'मधील या कलाकारासोबत झळकणार आयुषमान - vicky donor
आयुषमानचा आयुष्यातील खऱ्या अर्थाने महत्त्वाचा असणाऱ्या या चित्रपटाला आता ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. आयुषमानने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दलची माहिती दिली आहे.
आयुषमानने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दलची माहिती दिली आहे. यासोबतच विकी डोनर चित्रपटात डॉक्टर बलदेव चढ्ढांचं पात्र साकारणाऱ्या अनू कपूर यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. विकी डोनरपाठोपाठ आता अनू कपूरसोबत आपण दुसऱ्यांदा स्क्रीन शेअर करणार असल्याची गोड बातमी आयुषमानने या खास दिवसाचं औचित्य साधत सांगितली आहे.
आयुषमानच्या आगामी 'ड्रीम गर्ल' चित्रपटात अनू कपूर सर आपल्या वडिलांची भूमिका साकारणार असल्याचे आयुषमानने या फोटोला कॅप्शन देत सांगितले आहे. अंधाधून आणि बधाई होसारख्या सुपरहिट चित्रपटांनंतर आता आयुषमानचे चाहते त्याच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.