महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

'ड्रीम गर्ल'च्या ट्रेलरमधील पुजाचा आवाज नेमका कोणाचा? आयुष्माननं सांगितलं सत्य - प्रेक्षक

ट्रेलरमध्ये आयुष्मानने अनेकांची ड्रीम गर्ल बनत मुलीच्या आवाजात त्यांच्यासोबत गप्पा मारल्याचं पाहायला मिळालं. हा आवाज नेमका कोणाचा? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती.

ड्रीम गर्ल

By

Published : Aug 17, 2019, 11:29 PM IST

मुंबई- वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा अभिनेता आयुष्मान खुराणा आता आपल्या आगामी चित्रपटसाठी सज्ज झाला आहे. नेहमीप्रमाणेच वेगळा आशय घेऊन 'ड्रीम गर्ल' सिनेमातून तो प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासोबतच या ट्रेलरनं प्रेक्षकांच्या मनात एक प्रश्न उपस्थित केला. या ट्रेलरमध्ये आयुष्मानने अनेकांची ड्रीम गर्ल बनत मुलीच्या आवाजात त्यांच्यासोबत गप्पा मारल्याचं पाहायला मिळालं. हा आवाज नेमका कोणाचा? याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती.

आता आयुष्माननेच स्टुडिओमध्ये आवाज डबिंग करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये त्यानं म्हटलं, जो पुजाचा आवाज तुम्ही ट्रेलरमध्ये ऐकला, तो माझा स्वतःचा आहे. धन्यवाद...आयुष्यमाननं काढलेल्या या हुबेहुब मुलीच्या आवाजानं त्यानं पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details